हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा

शेतीशाळा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात पिकांचा आणि शेतीपद्धतीचा अभ्यास करण्यास शिकविणे.

उद्दिष्टे :शेतामध्ये हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या व भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावरील उपाय स्थानिक पातळीवरच शोधण्याचा प्रयत्न करणे, सदर उपायांचा अवलंब करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य शेतकऱ्यांना प्रदान करणे, आणि हवामान अनुकूल तंत्रज्ञान समजावून घेऊन त्यांचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांच्या क्षमतेमध्ये वृद्धी करणे.

प्रयोगशील शेतकरी (Host Farmer) व प्रक्षेत्र, शेतकऱ्यांचा गट (Guest Farmers), प्रशिक्षक (Facilitator), तंत्रज्ञान/अभ्यासक्रम (Curriculum), प्रशिक्षण व्यवस्था, अत्यावश्यक निविष्ठा (Critical Inputs), प्रशिक्षण साहित्य आणि हे शेतीशाळेचे प्रमुख घटक आहेत. खरीप हंगामात सोयाबीन + तूर आणि कापूस + मुग/उडीद या आंतरपिक पद्धतीची अशा दोन शेतीशाळांचे नियोजन करण्यात येते. तथापि संबधित गावातील प्रमुख पिकरचना लक्षात घेऊन सोयाबीन व कापूस शिवाय असलेल्या इतर पिकांची शेती शाळेमध्ये समावेश करता येतो. तसेच रबी हंगामात देखील संबधित गावातील प्रमुख पिकरचना लक्षात घेऊन शेतीशाळेसाठी पिकाची निवड करून त्या पिकाच्या उत्पादन वृद्धीसाठी शेतीशाळेचे नियोजन करण्यात येते. ज्या गावांमध्ये रबी हंगामासाठी पुरेशी भूजल पातळी उपलब्ध आहे तेथे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पिकपद्धती घेण्याबाबत शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येते. ज्या गावामध्ये फळबागेचे क्षेत्र समूह स्वरूपात (किमान ३० शेतकरी) आहे तेथे मुख्य फळपिकासाठी शेतीशाळा आयोजित करण्यात येते.

पिके व हवामान अनुकूल वाण

पिकाचे नाव कृषि विद्यापिठनिहाय हवामान अनुकूल वाण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
कापूस
(ARBORIUM)
PA 255, PA 528 AK 205-3, JLA 505
कापूस
(HIRSUTUM)
NH 615 AKH- 9916
कापूस
(संकरीत)
NHH 250 (NON BT)
NHH 44 (BT)
JKAKL-116 (BT)
PKV HY-2 (BT.)
कापूस
(बीटी)
NH 615 CICR : AKH 081, AKH 9916
CICR : GJHV 374 BT, RAJAT BT(CICR BT-2), SURAJ BT(CICR BT-1), AK-32 BT.,
सोयाबीन MAUS- 612, MAUS-71 (SAMRUDDHI),
MAUS-158, MAUS-162
AMS-1001, JS-95-60 DS 228
महाबीज : JS 2029, JS-93-05
तूर BDN 716, BDN 711 AKPHM - 11303 (संकरीत)
AKT-8811 (सुधारित वाण), PKV-TARA
PHULE-12
मूग BM-2003-2 AKM 12-18 , PKV-AKM-4 महाबीज : उत्कर्षा
उडीद PDKV BLACK GOLD
हरभरा आकाश, BDN 798 जाकी 9218, पी के व्ही काबुली 4-1 फुले विक्रम, फुले विक्रांत, दिग्विजय, विराट, विजय, कृपा
इतर कृषि विद्यापीठ / संशोधन संस्था : राज विजय- 202, राज विजय-203,
रबी ज्वारी परभणी मोती , परभणी ज्योती पी के व्ही क्रांती फुले वसुधा, फुले अनुराधा, फुले सुचित्रा, फुले रेवती, मालदांडी