प्रकल्पाची माहिती

प्रकल्प उददेश

महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य्य करणे.

प्रकल्प क्षेत्र

महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमधील ५१४२ गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे. सदर गावांची निवड लघुपाणलोट आधारित करण्यात आली आहे. हवामान बदलास असुरक्षितता, संवेदनशीलता आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यांच्या एकत्रित निर्देशांकानुसार गाव समूह निश्चित करण्यात आले आहेत. लघु पाणलोटाचे सरासरी क्षेत्र सुमारे ५००० हेक्टर एवढे असून यामध्ये सरासरी ७ ते ८ गावांचा समावेश आहे.