रुंद बरंबा सरी(बीबीएफ) लागवड पध्दती

बीबीएफ यंत्राचा वापर कसा करावा

बीबीएफ यंत्राद्वारे बियाणे पेरणी व खते देणे एकाच वेळी करता येते.या यंत्राच्या सहाय्याने रुंद वरंबे (1.2 ते 1.5 पर्यंत) तयार करणे व पेरणीचे काम सोवबतच करता येते. याशिवाय पूर्वी सांगीतल्याप्रमाणे खतेही देता येतात. “बीबीएफ” यंत्र म्हणजे रुंद वरंबा सरी टोकण व आंतरमशागत यंत्र म्हणजेच ब्रांड बेड फरो (बीबीएफ) असे याचे नाव आहे. हे यंत्र ट्रॅक्टर चलीत असून या यंत्राद्वारे एकाच वेळेला रुंद बरंबा व सरी पाडून त्यावर पेरणी शक्त होते. या यंत्रामध्ये सरी पाडण्यासाठी दोन बाजूंना दोन रिजर असतात. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार योग्य त्या आकाराच्या व खोलीच्या स-या पाडता येतात. उदा. 30, 40 व 60 सेंटिमीटर रुंद व 10, 15 व 20 सेंटिमीटर पर्यंत खोल स-या या यंत्राद्वारे पाडता येतात विशेषत दोन स-यांमध्ये रुंद वरंबा तयार होऊन त्यावर टोकणयंत्राच्या सहाय्याने पेरणी करता येते. पिकाच्या दोन ओळी व दोन रोपांमधील शिफारस केलेल्या अंतरानुसार यंत्रामध्ये (अंतरानुसार ) बदल (कमी - जास्त) करता येते.

सोयाबीन पिकासाठी बीबीएफ यंत्राचा वापर कसा करावा :

सोयाबीन पिकाची लागवड दोन प्रकारे करता येते एक 45 x 5 सें.मी. (दीड फूट दोन ओळीतील अंतर व दोन इंच झाडातील अंतर ) किंवा 30 x 7.5 सें.मी. यामध्ये दोन ओळीतील अंतर फुट व दोन झाडातील अंतर तीन इंच असेल अशा पध्दतीने पेरणी करुन हेक्टरी 4,44,444 एवढी झाडांची संख्या असावी. अशाप्रकारे या अंतरावर सोयाबीन पिकाची बीबीएफ पध्दतीने लागवड करण्यासाठी एका रुंद वरंब्यावर तीन ते चार ओळी घेता येतात. यासाठी ( एकतर) दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. किंवा x 45 सें.मी. ठेवावे किंवा गरजेनुसार कमी जास्त करावे उदा 37.5 सेमी. यामध्ये बीबीएफ यंत्राच्या दोन फणीतील अंतर त्यानुसार ठेवावे (कमी - जास्त करावे). त्यानुसार योग्य अंतरावर दोन बीबी / रुंद वरंबे तयार होण्यासाठी 120 सेमी किंवा 1.20 मीटर अंतरावर खुणा करण्यात व त्यावर ट्रॅक्टरला जोडलेले बीबीएफ यंत्र एका बाजूने चालवल्यास 90 सेमी रुंदीचे वरंबे तयार होतात व दोन वरंब्यामध्ये एक फूट / 30 सेमी रुंदीची सरी तयार होते. येथे एका वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या 30 सेमी अंतरावर तीन ओळी घेता येतात.
तर जेव्हा एका वरंब्यावर चार ओळी (30 सेमी अंतरावर) घ्यावयाच्या असतील तेव्हा सरी घेण्यासाठीच्या खुणा 150 सेमी (1.5 मीटर) अंतरावर ठेवून ट्रॅक्टर चलीत बीबीएफ यंत्र चालवल्यास 120 सेमी अंतराचा रुंद वरंबा तयार होतो व त्यावर सोयाबीन पिकाचा चार ओळी घेता येतात. (30 सेमी अंतरावर). याच प्रकारे खरीप हंगामात मुग, उडीद, भुईमुग तर रबी हंगामात हरभरा, भुईमुग या पिकांची तर हळद, आले, यासारख्या नगदी पिकांची ही लागवड बीबीएफ पध्दतीने करता येते.
बीबीएफ पध्दतीने जल संधारण 15 ते 25% पर्यंत तर उत्पादनात वाढ 15 ते 20% पर्यंत साध्य होऊ शकते. म्हणूनच येत्या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडून वितरीत बीबीएफ यंत्राचा उपयोग करुन बीबीएफ पध्दतीने लागवड करावी आणि या पध्दतीने उत्पादनात वाढ करावी.