आपात्कालीन परिस्थितीत पिकांचे नियोजन

महाराष्ट्रातील सुमारे 80 टक्के क्षेत्र कोरडवाहू शेतीखाली आहे. कोरडवाहू शेती ही पूर्णपणे पावसावर निर्धारित असते. पाऊसमान आणि त्याची विभागणी चांकल्याप्रकारे असल्यास कोरडवाहू परीस्थितीत सुध्दा चांगले उत्पादन मिळते. परंतु मागील काही वर्षाचा पावसाचा अनुभव पाहिल्यास पावसाचे प्रमाणही कमी झाले असून पावसाच्या विभागणीत सुध्दा खूप मोठा अनियमितपणा आढळून आला आहे. हा अनियतिमपणा पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत, पिकांच्या मध्यावस्थेत आणि पक्कतेच्या काळातसुध्दा येऊ शकतो आणि त्यानुसार पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊ शकते. पावसाच्या अशा मोठया प्रमाणतील अनियमितपणाला आपात्कालीन परीस्थिती म्हणतात. अशी आपत्कालीन परिस्थिती ब-याचवेळा पावसामध्ये माठया प्रमाणात आकस्मिक बदल घडून आले म्हणजे निर्माण होऊ शकते. सर्वसाधारणपणे पाऊस नेहमीपेक्षा उशिरा सुरु होणे, पाऊस नेमीपेक्षा लवकर बंद होणे, पाऊस वेळेवर सुरु होणे व मध्येच मोठा खंड पडणे आणि अतिवृष्टी होणे अशाप्रकारे आप्तकालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते.

आपत्कालीन परिस्थितीत पिकांचे नियोजन

अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, परभणी येथे मागील 15 वर्षापासून आपात्कालीन पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात पावसाच्या अनियमित परिस्थितीत वेगवेगळी पिके आणि पिक पध्दती पेरुन त्या परिस्थतीत मिळणारे पिकांचे आणि पीक पध्दतीचे उत्पादन तपासण्यात आले तसेच वेगवेगळया परिस्थितीत रोग आणि कीडींचा प्रादुर्भाव यांची नोंद ठेवण्यात आली. या भरीव संशोधनातून आपत्कालीन परीस्थितीत कमीत कमी नुकसान होऊन चांगले उत्पादन आणि नफा देणारी पिके आणि पीक पध्दती शोधून शाधून काढून त्यांच्या शिफारसी करण्यात आल्या ही पर्यायी पिके आणि पीक योजना कशा पध्दतीने घ्यायच्या हे तक्ता क्रं. 1 मध्ये स्पष्ट केले आहे.

अशा पध्दतीने आपात्कालीन परिस्थितीत तग धरणारी पिके पेरणे इष्ट ठरते. अशा पिकामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात होणारे नुकसान कमी करता येते.

तक्ता क्र.1 आपात्कालीन परिस्थितीत घ्यावयाची पिके आणि पीक पध्दती

अ.क्र पेरणी योग्य पावसाचा आगमन कालावधी कोणती पिके घ्यावीत कोणती पिके घेऊ नयेत
1. 15 जून ते 30 जून सर्व खरीप पिके ----
2. 1 जुलै ते 7 जुलै सर्व खरीप पिके ----
3. 8 जुलै ते 15 जुलै कापुस, सं ज्वारी, सं.बाजरी, सोयाबीन, तूर,तीळ, सूर्यफूल भुईमूग, मूग आणि उडीद
4. 16 जुलै ते 31 जुलै सं. बाजरी, सुर्यफुल, सोयाबीन+ तूर, बाजरी + तूर, एरंडी + धने, एरंडी + तूर कापुस, सं. ज्वारी, भुईमुग
5. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट एरंडी आणि तीळ सं.बाजरी, रागी, सूर्यफूल, तूर, एरंडी + धने, एरंडी + तूर, एरंडी आणि धने (अपरिहार्य परिस्थितीत) कापुस, सं. ज्वारी, भुईमुग
6. 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट सं. बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी + धने, एरंडी + तूर आणि धने कापुस, सं. ज्वारी, भुईमुग, रागी आणि तीळ
7. 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर रब्बी ज्वारी, करडई आणि सूर्यफूल हरभरा, जवस आणि गहू
8. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर रबी ज्वारी, करडई आणि जवस सूर्यफूल, गहू
9. 16 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर हरभरा, करडई, गहू आणि जवस रब्बी ज्वारी आणि सूर्यफूल

सर्वसाधारणपणे उशिरा पेरणीसाठी तूर, बाजरी, सूर्यफूल, एरंडी, आणि हलक्या जमिनीसाठी एरंडी, तीळ आणि कारळ ही पिके चांगली आढळून आली आहेत. उशिरा पडलेला जास्त प्रमाणातील पाऊस आणि अति वृष्टीच्या वर्षात सार्वाधिक नफा तूर या पिकापासून मिळालेला आहे. त्याचबरोबर एरंडी आणि साळ हि पिके सुध्दा अतिवृष्टीच्या वर्षात फायदेशीर आढळून येतात.

पावसाच्या ताणांमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन :

आपात्कालीन परिस्थितीत शिफारस करण्यात आलेली पिके आणि पीक पध्दती घेतल्यानंतर पावसाचा ताणपिकाच्या कोणत्याही कालावधीत पडू शकतो.

सर्वसाधारणपणे पावसाच्या तणांचे तीन प्रकारे वर्गीकरण करता येईल.

1 . खरीप हंगामाच्या सुरुवातीस पावसाचा ताण:

हंगामाच्या सुरुवातीस पावसाचा ताण हो खरीप हंगामातील पिके पेरल्याबरोबर अथवा मुळातच पावसाला उशिरा सुरुवात झाल्यानंतर पडतो. खरीप पिकांची पेरणी झाल्याबरोबर पावसाचा ताण पडल्यास पिकांची कोवळी रोपे सुकतात. काही रोपे मरुन जातात आणि पर्यायाने झाडांची प्रमाणित संख्या राखली जात नाही. अशा परिस्थितीत झाडांची संख्या 25 टक्के प्रमाणित संख्येपेक्षा कमी असल्यास पिकामधील नांगे भरून काढावीत. नांगे भरताना बी योग्य ओलीत पडेल याची दक्षता घ्यावी. कोवळया रोपांना मातीचा आधार द्यावा.
जर झाडांची संख्या 50 टक्क्यापेक्षा कमी असेल आणि रोपे वाळण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात असेल तर पेरलेले पीक मोडून नव्याने पेरणी करावी त्यासाठी तक्ता क्र. 1 मध्ये दर्शविलेल्याप्रमाणे त्या त्या वेळी योग्य पिके आणि पीक पध्दती पेराव्यात, ज्यामुळे होणारे नुकसान कमी प्रमाणात होऊन चांगला फायदा मिळतो.

2. हंगामांच्या मध्यावस्थेत पडणारा पावसाचा ताण:

* पावसाच्या ताणाच्या काळात पिकांतील तणांचा बंदोबस्त योग्य वेळी करावा आणि कोळप्याने वरचेवर उथळ मशागत करावी. यामुळे पिकाबरोबर तणांची स्पर्धा कमी होऊन जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकेल.

* शेतातील कडीकचरा तसेच काढलेले अर्धवट सुकलेले तण शेतामध्ये पसरवून टाकावे ज्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची उपलब्धता वाढते.

* खरिपातील पिकांची उगवण झाल्यावर सर्वसाधारण 15 ते 20 दिवसांनंतर पिकांमध्ये 4 ते 6 ओळीनंतर बळीराम नांगराने अथवा कोळप्याच्या मदतीने स-या काढाव्यात. यामुळे सुरुवातीस पडलेला पाऊस स-यामध्ये साठविला जाऊन पाण्याची उपलब्धता वाढते. उत्पादनात 15 -20 टक्के वाढ होते.

* या काळात विहिरीमध्ये अथवा शेततळयात पाणी असल्यास पिकाला संरक्षित पाणी द्यावे.

3. हंगामातील शेवटच्या कालावधीत ताण:

पिकाच्या अथवा हंगामातील शेवटच्या कालावधीत पावसाचा ताण हा मान्सून नेहमीपेक्षा लवकर बंद झाल्यास पडतो. अशा अवस्थते पावसाचा ताण पडल्यास दाण्याची संख्या घटून दाण्याचे वजन सुध्दा कमी होते. पर्यायाने उत्पादनात घट येते. अशा अवस्थेत इतर कोणत्याही उपायाचा फारसा फायदा होत नाही अथवा आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. यासाठी संरक्षित पाणी देणे हा एकमेव उपाय आहे.

संशोधनातून असे निदर्शनास आले की आपात्कालीन परिस्थितीत कोणतेही सलग एक पीक घेण्यापेक्षा मुख्य पीक आधारित आंतरपीक पध्दती, शिफारस केलेल्या प्रमाणानुसार घेणे जास्त फायद्याचे ठरते जसे : ज्वारी + तूर (3:3 किंवा 4:2 ओळी), बाजरा + तूर (3:3 ओळी), कापूस + सोयाबीन (1:1 ओळ), कापूस + उदीड (1:1 ओळ), सोयाबीन + तूर (4:2 ओळी), एरंडी + सोयाबीन (1:1 ओळ), एरंडी + धने (1:2 ओळी)

या पध्दतीने आंतरपीक पध्दतीचे अवलंबन करावे. आपात्कालीन पीक परिस्थितीत रोग आणि किडीचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते त्यामुळे रोग प्रतिबंधक आणि किडींना कमी बळी पडणा-या पिकांच्या वाणांची निवड करावी.

अशा प्रकारे चालू हंगामात आपात्कालीन पीक परिस्थितीत निर्माण झाल्यास शेतक-यांनी सदरील लेखाचे अवलोकन करुन सर्व तांत्रिक बाबींचे अवलंबन करावे आणि योग्य अशी पिके आणि पीक पध्दती घेउुन संभाव्य उत्पादनातील घट कमी करुन अपेक्षित उत्पादन वाढवावे.