खरीप हंगामातील पीक नियोजन

भारतामध्ये 1966 सालापासून संकरित युग सुरू झाले. संकरित युगापूर्वी अन्नधान्याची समस्या फार माठ्या प्रमाणात होती. संकरित युगाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दशकातच प्रामुख्याने अन्नधान्य पिकाची ( गहू, ज्वारी, बाजरी, मका, भात) उत्पादकता आणि उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वाढले आणि ख-या अर्थाने हरित क्रांतीची सुरुवात झाली. उत्पादन वाढीचा वेग हा दुस-या दशकात वाढला व तिस-या दशकात स्थिरावला. लोकसंख्या वाढीचा दर मात्र वाढतच आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उत्पादनवाढीचा दर न वाढल्यास भावी काळात अन्नधान्याची समस्या पुन: निर्माण होऊ शकेल.

आज आपल्या देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात 83 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. कोरडवाहू शेतीचा उत्पादन वाढीमध्ये फाार मोठा वाटा आहे आणि त्यामुळे कोरडवाहू शेतीमधील उत्पादकता वाढविणे ही काळाची गरज आहे. कोरडवाहू परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा व इतर साधन संपत्तीचा एकत्रित उपयोग करुन उत्पादन वाढविणे ही काळाची गरज आहे. कोरडवाहू परिस्थितीत उपलब्ध पाण्यावा व इतर संपत्तीचा एकत्रितपणे उपयोग करुन उत्पादन वाढविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी पीक नियोजनास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पिकाचे उत्पादन हे त्या विभागातील जमिनीचा प्रकार, हवामान आणि पर्जन्यमान या गोष्टींवर अवलंबून असते. पीक नियोजन या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. व्यवहारी, हुशार आणि दूरदृष्टी असलेला शेतकरी पीक नियोजन अगदी वेगळ्या पध्दतीने करु शकतो.

महाराष्ट्रातील शेती बहुतांशी पावसावर अवलंबून असून पावसाचे प्रमाण हे अनियमित असल्यामुळे पीक उत्पादनात स्थिरता आढळून येत नाही. याकरिता पावसाचे पाणी व जमीन यांचे तांत्रिकदृष्ट्या संधारण करुन या संपत्तीचा उपयोग कोरडवाहू शतीत शाश्वत उत्पादन मिळवण्यासाठी करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक नियोजन हे परस्परांशी अतिशय निगडित असून दोन्ही घटकांना पीक उत्पादन वाढीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.

महाराष्ट्रामध्ये आत्यंतिक प्रयत्न करुन सुध्दा बागायती क्षेत्र 27 टक्क्यापेक्षा अधिक वाढविणे अवघड जाणार आहे. म्हणजेच 73 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू राहणार असून उपलब्ध जलसंपत्तीचा वापर पिकाच्या नियोजनासाठी करुन पिकाची उत्पादकता वाढविणे जरुरीचे आहे.

पिकाचे नियोजन म्हणजे काय?

याही किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे पीक 20 ते 25 दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो. ऊंट अळ्यांच्या अनेक प्रजातीपैकी गेसोनिया गेमा या प्रजातीचा आपल्या भागात सोयाबीनच्या सुरुवातीच्या असस्थेत व सर्वात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होताना आढळून येत आहे. या किडीची अळी लहान, रंगाने फिकट हिरवी असून अतिशय चंचल असते. त्यामुळे झाड जरासे जरी हलवले तरी अनेक अळया पटकन झाडावरुन खाली पडतात. या किडीच्या लहान अळ्या स्पोडोप्टेराप्रमाणे फक्त पानांचे हरितद्रव्य खरवडून खातात त्यामुळे इथेही पानांवर पातळ पारदर्शक खिडक्या तयार होतात. मोठया अळ्या पानांना वेगवेगळ्या आकाराची छिद्रे पाडून खातात. त्या फुले व शेंगाही खातात. फक्त शेंगांवर दाण्यांच्या जरासे वरच्या बाजून खातात. कोणत्याही प्रजातीची असली तरी ऊंट ओळखण्याची सोपी खुण म्हणजे त्या चालताना पाठीत बाक काढून चालतात.

पिकाच्या नियोजनाची आवश्यकता:

पीक नियोजनात खालील बाब महत्त्वाच्या आहेत:

1. शेती व्यवसायामध्ये सुसूत्रीपणा आणणे.

2. शेतक-यांसाठी लागणा-या जीवनावश्यक वस्तू उदा. अन्नधान्य, गुरांसाठी चारा तसेच शेतीसाठी लागणो बी-बियाणे, खते, कीटकनाशके, घरगुती खर्च, मशागतीचा, मजुरांवरील खर्च व यासाठी लागणारा पैसा वेळोवेळी उपलब्ध होणे.

3. शेती व्यवसायामध्ये शेतक-यांची तारांबळ न होता त्यांच्या सर्व कामात सुसूत्रता आणणे.

4. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी फायदेशीर पीक नियोजन करुन उत्पादनामध्ये येणारी घट कमी करणे आणि उत्पादनात स्थिरता आणणे.

पिकाचे नियोजनासाठी विचारात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी:

खरीप हंगामातील पिकाचे नियोजन करीत असताना जमिनीचा प्रकार, हवामान, पर्जन्यमान, बागायतीची सोय, तांत्रिक मशागत पध्दती, आर्थिक परिस्थिती, बाजारपेठ पिकाचा कालावधी इत्यादी सर्व बाबींचा विचार करुनच आपणस खरीप हंगामातील पिकांचे नियोजन करता येईल.

1 . जमिनीचा प्रकार

तक्ता क्र. 1 जमिनीच्या खोलीनुसार घ्यावयाची पिके

जमिनीची खोली
(सें.मी)
उपलब्ध ओलावा
(सें.मी)
कोणती पिके घ्यावीत
7.5 पेक्षा कमी 15 ते 20 वनशेती, कवठ, चारोळी करवंद, बिब्बा, इत्यादी मटकी, एरंडी, हुलगा, बाजरी + मटकी (2:१)
केस22.5 ते 45 40 ते 64 सुर्यफुल, बाजरी, तूर, बाजरी + तुर () 2:1
45 ते 60 60 ते 150 खरीप ज्वारी, तूर, देशी कापुस, मूग, उडीद, करडई, सूर्यफूल, हरभरा, सोयाबीन
60 सें.मी. पेक्षा जास्त 150 पेक्षा जास्त सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, रबी ज्वारी, करडई, हरबरा

(टीप : 0 ते 30 सें.मी. खोलीच्या जमिनीमध्ये पिकापेक्षा फळझाडे घेणे जास्त फायदेशीर ठरते.)

2. हवामान आणि पर्जन्यमान :

संबंध महाराष्ट्राचा विचार केल्यास जमीन व पर्जन्यमानानुसार महाराष्ट्राचे प्रामुख्याने 9 पावसाळी विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार तक्ता क्रमांक 4 मध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रमुख पिकांचे नियोजन करावे.

अ.क्र. विभाग सरासरी पाऊस प्रमुख पिके
1 दक्षिण कोकण 3000 ते 5000 भात
2 उत्तर कोकण 2500 ते 5000 भात
3 पाटमाथा 5000 ते 6000 भात
4 उपपर्वतीय 1750 ते 3000 ज्वारी, भात, ऊस, गहू
5 सपाट 750 ते 950 ज्वारी, भात, गहू, मुग, उडीद, रबी ज्वारी
6 अवर्षण प्रवण 750 ते 950 बाजरी, तूर, हुलगा, मटकी, रबी ज्वारी
7 हमखास पावसाचा प्रदेश 750 ते 950 ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भुईमुग, कापूस, करडई, हरभरा, गहू
8 मध्य विदर्भ 950 ते 1150 ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, गहू, हरभरा
9 पुर्व विदर्भ 1150 ते 1700 भात, ज्वारी, तूर, भुईमुग


3. सुधारीत तंत्रानुसार पिकाची लागवड करणे.

पीक नियोजनात पीक निवडीला जसे महत्त्व आहे तसेच त्या प्रत्येक पिकांच्या अधिक उत्पादन देणा-या संकरित व सुधारित जातींचा वापर, योग्य वेळी पेरणी, रोपांची योग्य संख्या ठेवणे, सुधारित पीक पध्दती, संतुलित खताचा वापर, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर, एकात्मिक कीड नियंत्रण, योग्यवेळी तणांचा बंदोबस्त करणे, आंतर मशागतीची कामे वेळेवर करणे, अधिक उत्पादन मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे. पिकांच्या उन्नत वाणांच्या सुधारित तंत्राचा वापर योग्य त-हेने केल्यास निश्चित अधिक उत्पादन मिळते. (पान क्र. 15 व 16 वरील तक्ते पहावेत.) पिकाचे स्थानिक वाण, खताचा असंतुलित वापर, पीक मशागतींचा अभाव यामुळे हंगामात पाऊसमान चांगले असल्यावर सुध्दा अपेक्षित उत्पादन वाढ होऊ शकत नाही. म्हणून शेतक-यांनी इतर बाबींबरोबर सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.