समितीचे गठन व रचना

प्रकल्पांतर्गत निवडलेल्या प्रत्येक गावांमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 (49) अन्वये ग्राम कृषि संजीवनी समिती स्थापन करणेचा निर्णय घेणेत आलेला आहे. सदर समिती ग्रामपंचायतीची विकास/ प्रकल्प समिती म्हणून कार्यरत असेल. समितीमधील कार्यकारी सदस्यांची संख्या 13 असेल. समितीमधील एकूण सदस्यांपैकी किमान दोन तृतीयांश सदस्य अत्यल्पभूधारक (जमीनधारणा 1 हे. पर्यंत) किंवा अल्पभूधारक (जमीनधारणा 1 ते 2 हे.) असतील. तसेच एक तृतीयांश सदस्य हे ग्रामपंचायत सदस्यांपैकी असावेत. त्याचप्रमाणे समितीमध्ये महिला सदस्यांचे प्रतिनिधित्व किमान 50% असणे बंधनकारक आहे. सदर समितीमध्ये ग्रामपंचायतीच्या ज्या गावांमध्ये प्रकल्प राबवायचा आहे त्याच गावातील सदस्यांचा समावेश राहील. (मात्र सरपंच व उपसरपंच यासाठी अपवाद असतील.) समितीची रचना पुढीलप्रमाणे असावी.

अ.क्र समिती सदस्य व त्यांचा प्रवर्ग/ कार्यक्षेत्र सदस्य संख्या पदनाम
1.कार्यकारी सदस्य
1 सरपंच 1 पदसिद्ध अध्यक्ष
2 उप सरपंच 1 पदसिद्ध सदस्य
3 ग्रामपंचायत सदस्य- (पुरुष 1 व महिला 1) 2 सदस्य
4 प्रगतशील शेतकरी (सर्वसाधारण- 1, अ. जाती/अ. जमाती/ विमुक्त जाती/भटक्या जमाती -1) 2 सदस्य
5 महिला शेतकरी (सर्वसाधारण- 1, अनुसूचित जाती/अ.जमाती -1, विमुक्त जाती/भटक्या जमाती -1) 3 सदस्य
6 शेतकरी उत्पादक गट/कंपनी प्रतिनिधी 1 सदस्य
7 महिला बचत गट प्रतिनिधी 1 सदस्य
8 कृषि पूरक व्यावसायिक शेतकरी 2 सदस्य
अ. एकूण कार्यकारी सदस्य 13
2.अकार्यकारी सदस्य
1 कृषि सहाय्यक 1 पदसिद्ध तांत्रिक सदस्य
2 ग्राम सेवक / ग्राम विकास अधिकारी 1 सदस्य सचिव
3 समूह सहाय्यक 1 सह सचिव
4 कृषि मित्र 1 विस्तार कार्य प्रेरक
ब. एकूण अकार्यकारी सदस्य 4