हवामान अनुकूल तंत्रज्ञान महत्त्व व आवशक्यता

मागील काही वर्षातील हवामानातील बदल व पर्जन्यमानातील अनिश्चितता जसे पावसाचे एकूण कमी दिवस, कमी वेळेत जास्त पाऊस, सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसाचा तीन आठवड्यांपेक्षा जास्त खंड, मान्सूनचे उशिरा आगमन व वेळेपुर्वी निघून जाणे, गारपीट व अवेळी पाऊस या सर्व हवामानातील बदलामुळे पाणी टंचाई (पिण्यासाठी, जनावरांसाठी, पिकांसाठी), पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेत घट, कृषी उत्पादन वाढीचा दर घटणे, अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले, ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर होऊ लागले ई. परिणाम दिसू लागले.

वाढत्या तापमानामुळे कोरडवाहू पिकाच्या उत्पादक्तेवरील परिणाम तसेच जमिनीतील कर्बामध्ये व ओलाव्यामध्ये घट, कमी कालावधीत पडणाऱ्या आणि पावसामुळे होणारी प्रचंड जमिनीची धूप, अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकाकरीता पाणी उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम, किडींच्या संखेमध्ये व प्रादुर्भावात वाढ इ. शेतीवर वातावरणातील बदलामुळे संभाव्य दूरगामी परिणाम दिसून येतील. या सर्व दूरगामी परिणामांचा विचार करता बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून हवामान अनुकूल तंत्रज्ञानचा शेतीशाळा या माध्यमाद्वारे प्रसार व अवलंब करणे आवश्यक आहे.

हवामान अनुकूल तंत्रज्ञान

क्रमांक हवामान अनुकूल तंत्रज्ञान हवामान अनुकुलता वैशिष्ट्ये व फायदे
हवामान अनुकूल वाणांचा वापर जमिनीतील ओलाव्याच्या ताणास सहनशिलता, खारपाण जमिनीत क्षारतेस सहनशीलता
समतल मशागत व पेरणी अपधावाचे व्यवस्थापन आणि जमिनीतील ओलावा व जमिनीची सुपीकता वृद्धी
बी बी एफ तंत्रज्ञानाने लागवड जमिनीमधील ओलावा टिकणे, अतिपावसामुळे निर्माण झालेल्या जादा पाण्याचा निचरा, पिकांच्या मुळांभोवती हवा खेळती राहणे
आंतरपीक पद्धती हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारी जोखीम कमी, जमिनीच्या सुपिकातेमध्ये वृद्धी
कमी/शून्य मशागत जमिनीतील कार्बामध्ये वृद्धी, जमिनीतील ओलावा टिकून राहणे, उत्पादन खर्चामध्ये कपात
एक आड एक किंवा दुसऱ्या/
चौथ्या ओळीनंतर सारी काढणे
कोरडवाहू शेतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीत साठविण्या मदत
बंदिस्त सरी पावसाचे पाणी मुर्विन्यास मदत होते, जमिनीतील ओलावा टिकून राहतो
आच्छादनाचा वापर जमिनीतील ओलावा टिकून राहणे,
हिरवळीच्या खताचा वापर जमिनीच्या सुपिकतमध्ये वृद्धी, सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत.
१० भूसुधाराकांचा वापर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, पिकांची क्षारास सहनशीलता वाढवणे
११ एकात्मिक कीड व्यवस्थापन उत्पादन खर्चामध्ये बचत, रासायनिक किडनाशाकांचा वापर कमी, किडींमध्ये रासायनिक प्रतिकारशक्ती कमी
१२ सूक्ष्म सिंचन पाण्याची बचत, पिकास आवश्यक तेवढेच पाणी मिळते
१३ संरक्षित सिंचन पावसाचा खंड पडल्यास संवेदनशील अवस्थेमध्ये
१४ संरक्षित लागवड वातावरणातील बदलापासून पिकांचे संरक्षण, कमी क्षेत्रावर अधिक उत्पादन, पाण्याची बचत
१५ फळझाडांचा आकार मर्यादित
ठेवणे (Canopy Management)
पाण्याची गरज कमी, झाडाच्या घेरामध्ये सूर्यप्रकाशाची उपलब्धता अधिक