नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २.०

( महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प )
English
  • प्रकल्पाची माहिती
  • आपले प्रश्न
  • नागरिकांसाठी

नागरिकांसाठी

नागरिकांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP) हा हवामान बदलास संवेदनशील असलेल्या गावांमधील लहान व सीमांत शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेता यावे व उत्पन्नामध्ये शाश्वत वाढ व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांच्या सहकार्याने ६ वर्षे कालावधीसाठी राबवला जाणारा प्रकल्प आहे.

प्रकल्पाचा दुसरा टप्पा महाराष्ट्रामधील 21 जिल्ह्यांमध्ये निवडलेल्या 7201 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. आपले गांव प्रकल्पामध्ये आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी https://mahapocra.gov.in/mr/project_village येथे क्लिक करावे.

सदर प्रकल्पामध्ये कृषिविषयक वैयक्तिक लाभाच्या बाबी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना पायाभूत सुविधा, प्रक्रिया आणि विपणन विषयक लाभाच्या बाबी, कृषि-उद्योग तसेच मृदा व जलसंधारण विषयक उपाययोजना इत्यादी कामांना अनुदान देण्यात येते. अधिक सविस्तर माहितीसाठी https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/ येथे क्लिक करावे.

प्रकल्प क्षेत्रातील सर्व लहान व सीमांत शेतकरी, भूमिहीन शेतकरी, स्वयं-सहायता गट (SHGs), शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) यांना अनुदान दिले जाते. त्यात अनुसूचित जाती-जमाती, महिला व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले जाते.

प्रकल्पामध्ये केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येतात. अर्जाची नोंदणी https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/IndividualFarmer/Login या पोर्टलवर करता येईल. त्यासाठी आपण आपल्या गावातील समूह सहायक, सहाय्यक कृषि अधिकारी यांची मदत घेऊ शकता. त्यासाठी कोणासही पैसे अथवा मोबदला देण्याची गरज नाही.

आधार कार्ड, फार्मर आयडी (शेतजमिनीचा ७/१२ उतारा, 8-अ करिता), आधार लिंक बँक खाते, जात / अपंगत्व प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास), भूमिहीन कुटुंबाचा दाखला (आवश्यक असल्यास).

वैयक्तिक लाभाकरीता शेतजमीन प्रकल्प क्षेत्रात असावी, जमीनधारणा 5 हेक्टर पर्यंत (लहान व मध्यम शेतकरी) असावी. गटशेती किंवा FPC करिता प्रकल्पाअंतर्गत निवड झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी असावी.

आपण ऑनलाइन अर्ज केल्यानंतर खालीलप्रमाणे कार्यवाही होईल: अ) अर्ज ग्राम कृषि विकास समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. ब) मंजुरीनंतर प्रकल्पाचे संबंधित अधिकारी प्रकल्प स्थळाची पाहणी करतील. क) स्थळ निश्चितीनुसार घटक राबविण्यासाठी पूर्वसंमती दिली जाईल. ड) पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर आपण प्रकल्पाची अंमलबजावणी करावी लागेल (यासाठी कोणतीही रक्कम अगोदर दिली जाणार नाही). इ) काम पूर्ण झाल्यावर झालेल्या कामाचे बिल ऑनलाईन अपलोड करून अनुदानाची मागणी करावी. ई) संबंधित अधिकारी मोका तपासणी करतील आणि तपासणीनुसार मार्गदर्शक सूचनेप्रमाणे देय अनुदान आपले आधार लिंक बँक खात्यावर जमा केले जाईल.

क्षेत्र उपचार, ओघळीवरील उपचार, भूजल पुनर्भरण, इत्यादी संदर्भातील कृषि विभागामार्फत राबविण्यात येणारी कामे प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट गावांमध्ये करण्यात येतील.

होय, भूमिहीन कुटुंबाकरिता शेळीपालन आणि कुक्कुटपालन अशा पूरक उपजीविकेच्या स्वरूपात मदत मिळते.

होय, महिला व महिला गटांना प्राधान्य दिले जाते, प्रशिक्षण आणि अनुदान देय आहे.

कमी पाणी लागणारी पिके घेणे, बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच, उत्पादन खर्च कमी करणे, नवीन तंत्रज्ञान वापरणे यामुळे उत्पन्न वाढते.

ग्राम कृषि विकास समिती ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार आधुनिक तंत्रज्ञान, शासन योजना व मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन शेती व शेतीपूरक व्यवसायांतून शाश्वत उत्पन्नवाढ साधणे या उद्देशातून स्थापन होणारी शेतकरी प्रतिनिधी संस्था आहे.

गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नोंदणीकृत केलेली ही कंपनी आहे.

संबंधित FPC/गटातील सर्व सदस्यांसाठी उपलब्ध राहते. वापर पद्धती गट/FPC ठरवते.

आपण प्रकल्पाच्या पोर्टलवर लॉगिन करून आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता. तसेच प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर आपणांस SMS द्वारे अर्जाची सद्यस्थिती कळविण्यात येईल.

आपण अर्ज केल्यावर मार्गदर्शक सूचनेनुसार प्रकल्प राबविण्यासाठीचा कालावधी पूर्वसंमती पत्रात नमूद केलेला असेल तसेच प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर SMS द्वारे देखील कालमर्यादा कळविण्यात येईल.

प्रकल्पातील घटकांच्या मार्गदर्शक सूचना प्रकल्पाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. https://mahapocra.gov.in/mr/project_guidelines येथे क्लिक करावे.

एकाच घटकासाठी दोन वेळा लाभ घेता येणार नाही.

संबंधित ग्राम कृषि विकास समिती, तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय येथे तक्रार दाखल करता येईल. त्याशिवाय प्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळावर (link) या लिंकवर जाऊन तक्रार नोंदवता येईल.

होय, मोबाईलवर एकत्रित सर्व माहिती पाहता येईल असे महाविस्तार-AI हे महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत विकसित केलेले अॅप आहे. त्यावर शेतीशी संबंधित सर्व बाबीची अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रकल्प गावातील ग्रामपंचायत कार्यालय, सहायक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय येथे अथवा प्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahapocra.gov.in/ येथे जाऊन माहिती मिळवता येईल.

संपर्क साधा

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP), ३० ए/बी, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४००००५.

  • ०२२-२२१६३३५२( प्रकल्प बाबींच्या माहितीसाठी )
  • सकाळी ९:४५ ते संध्या.६:१५ सोमवार ते शुक्रवार (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता)
  • भ्रमणध्वनी : ७९००१६४३१४

© कृषि विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.

Vichara