नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २.०

( महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प )
English
  • प्रकल्पाची माहिती
  • आपले प्रश्न
  • अधिकाऱ्यांसाठी

अधिकाऱ्यांसाठी

प्रकल्प ऍप्लिकेशन व पोर्टल

प्रकल्पाच्या https://mahapocra.gov.in/mr/applications या संकेतस्थळावर PoCRA Application वर Water Budget App व MLP App उपलब्ध आहेत. सदर ऍप कृषी सहाय्यकांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावीत. कृषी सहाय्यकांना Water Budget App व MLP App मध्ये लॉगिन करण्यासाठी https://team-ndksp.mahapocra.gov.in/ या पोर्टलवरून प्राप्त Username व आधार नंबर आधारीत बदललेला Password टाकायचा आहे. Captcha टाकायचा आहे. आधार लिंक मोबाईल नंबरवर येणारा OTP टाकायचा आहे. ऍपमध्ये गाव निवडून त्यामध्ये माहिती भरायची आहे.

प्रकल्पाने विकसित केलेल्या Water Budget App च्या पुस्तिका https://mahapocra.gov.in/user_manual आणि MLP App च्या पुस्तिका https://mahapocra.gov.in/home/user_manual वर उपलब्ध आहेत.

ग्राम कृषी विकास समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणजेच सरपंच यांचे प्रशिक्षण शासकीय संस्थांमध्ये झालेले आहे. तर सदस्यांचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

प्रथमतः Water Budget App मधील १. पिण्याच्या पाण्याची गरज; २. खरीप हंगामातील पाण्याचा ताळेबंद आणि ३. रब्बी हंगामातील प्रस्तावित पिकानुसार पाण्याचा ताळेबंद यामध्ये माहिती भरावी. त्यानंतर Water Budget App हाताळणीची माहिती पुस्तिका https://mahapocra.gov.in/user_manual वर उपलब्ध आहे. यामध्ये पृष्ठ क्र. ४० ते ५६ वर अस्तित्वातील व प्रस्तावित कामे चिन्हांकित करण्याविषयी सखोल माहिती दिलेली आहे.

Water Budget App व MLP App करिता updated version https://mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असते. त्यावरून वेळोवेळी नवीन version download करून त्यामध्ये login करावे.

प्रकल्प गावे

प्रकल्प टप्पा-2 साठी जागतिक बॅंकेची मंजुरी प्राप्त झालेली आहे. जागतिक बॅंकेच्या सूचनांनुसार प्रकल्प पुस्तिका तयार करण्यात येत आहेत. त्याआधारे तयार करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचना बँकेशी प्रकल्प करार व कर्ज करार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा https://mahapocra.gov.in/site/upload/GR/GR%2014.10.2024%20Phase%202.pdf

परिशिष्ट - 1 नुसार

परिशिष्ट - 1 नुसार

प्रकल्प टप्पा-2 करिता गावांची निवड केल्याविषयीचा शासन निर्णय कृषी व पशुधन विभागाने १४.१०.२०२४ रोजी निर्गमित केलेला आहे. प्रकल्प टप्पा-2 ची गावे नकाशावर पाहण्यासाठी https://gis.mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर GIS डॅशबोर्डवर उपलब्ध आहेत.

अ.क्र. गाव प्रकार सूक्ष्मनियोजन प्रक्रिया ग्राम कृषि विकास समिती स्वयंसेवक कृषिताई
केवळ महसूली गाव असलेली ग्रामपंचायत प्रक्रिया राबवावी. संबंधित ग्रामपंचायतीमध्ये समितीचे गठन करावे. चार स्वयंसेवकांची निवड करावी. एका कृषिताईची निवड ग्रामसभेच्या मंजुरीने करावी.
महसुली गाव व पेसा गाव असलेली ग्रामपंचायत महसुली गावात स्वतंत्र प्रक्रिया राबवावी. तसेच, पेसा नियम 4 नुसार नव्याने घोषित पेसा गावातही स्वतंत्र प्रक्रिया राबवावी. संबंधित ग्रामपंचायतीमध्ये समितीचे गठन करावे. महसुली गावात चार स्वयंसेवकांची निवड करावी. तसेच, पेसा नियम 4 नुसार नव्याने घोषित पेसा गावातील चार स्वयंसेवकांचीही निवड करावी. महसुली गावात एका कृषिताईची निवड ग्रामसभेच्या मंजुरीने करावी. तसेच, पेसा नियम 4 नुसार नव्याने घोषित पेसा गावात कृषिताईची स्वतंत्र निवड करू नये. महसुली गावात कार्यरत कृषिताईच पेसा गावांसाठी कामकाज पाहील.
बेचिराख/उजाड गाव (फक्त शिवार असलेली गावे) शिवार फेरी हे तंत्र राबवावे. शिवार फेरीच्या मागील सर्वे नंबरमधील हितधारकांना यासाठी आमंत्रित करावे. आवश्यकतेनुसार लक्षित गटाशी चर्चा करावी. संपूर्ण गावात सूक्ष्म नियोजन प्रक्रिया एका दिवसात पूर्ण करावी. संबंधित ग्रामपंचायतीमध्ये समितीचे गठन करावे. निवड करू नये. निवड करू नये.
रीठ गाव (फक्त गावठाण असलेली गावे ) सूक्ष्म नियोजनातील लक्षगटचर्चा हे तंत्र प्रामुख्याने एका दिवसात राबवावे.भूमिहीन कुटुंबे व गटांसाठी कृषी व्यवसायाचे नियोजन करावे. संबंधित ग्रामपंचायतीमध्ये समितीचे गठन करावे. निवड करू नये. निवड करू नये.
नगर पंचायत मध्ये गेलेले गाव राबविण्यात येऊ नये. गठन करू नये. निवड करू नये. निवड करू नये.
लाभ क्षेत्रातील गावे राबवावी. संबंधित ग्रामपंचायतीमध्ये समितीचे गठन करावे. चार स्वयंसेवकांची निवड करावी. महसुली गावात एका कृषिताईची निवड ग्रामसभेच्या मंजुरीने करावी.
प्रशासक असलेली गावे सूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबवण्यात यावी. ग्रामसभेमध्ये आराखडा मंजूर करून घ्यावा. संबंधित ग्रामपंचायतीमध्ये समितीचे गठन करावे. प्रशासक असलेल्या ठिकाणी ग्राम कृषी विकास समितीचे गठन करता येत नाही. प्रशासकास प्रकल्प ओळख व आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. त्याच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन प्रक्रिया गावपातळीवर राबवण्यात येईल. तसेच ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर ग्राम कृषी विकास समितीचे गठन करावे. प्रशासकाने कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या मदतीने प्रकल्पाने दिलेल्या सूचनांनुसार गावासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक व्यक्तींची नावे घ्यावीत. त्यामधून चार स्वयंसेवकांची निवड करावी, ज्यामध्ये कमीत कमी दोन महिला असाव्यात. सदर निवडीस आगामी ग्रामसभेमध्ये मंजुरी घेण्यात यावी.

ग्राम कृषी विकास समिती

प्रकल्पाच्या https://mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर PoCRA Application मध्ये GKVS tab आहे. कृषी सहाय्यकाने यामध्ये login करण्यासाठी https://team-ndksp.mahapocra.gov.in/ या पोर्टलद्वारे प्राप्त Username आणि आधार क्रमांकाच्या आधारे बदललेला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर Captcha भरायचा आहे आणि आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकायचा आहे. अ. ग्राम कृषी विकास समितीची माहिती भरण्यासाठी https://gkvsndksp.mahapocra.gov.in/ वर login करावे. माहिती भरण्याच्या सूचनांनुसार सदस्यांची माहिती भरणे आवश्यक आहे.

प्रशासक असलेल्या ठिकाणी ग्राम कृषी विकास समितीचे गठन करता येत नाही. प्रशासकास प्रकल्पाची ओळख व आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन प्रक्रिया गावपातळीवर राबवण्यात येईल. तसेच ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर ग्राम कृषी विकास समितीचे गठन करावे.

ग्राम कृषी विकास समिती ही ग्रामपंचायतीची उपसमिती आहे. त्यामुळे तिची स्थापना ग्रामपंचायत स्तरावरच करावयाची आहे. अधिक माहितीकरिता कृषी व पदुम विभागाकडील शासन निर्णय क्र. संकलन-2020/ प्र.क्र. 81/3-अ, दिनांक 09.09.2020 चे वाचन करावे.

ग्राम कृषी विकास समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणजेच सरपंच यांचे प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष पद्धतीने झालेले आहे. तर सदस्यांचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

कृषिताई

प्रकल्पाच्या https://mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर PoCRA Application मध्ये GKVS tab आहे. कृषी सहाय्यकाने यामध्ये login करण्यासाठी https://team-ndksp.mahapocra.gov.in/ या पोर्टलद्वारे प्राप्त Username आणि आधार क्रमांकाच्या आधारे बदललेला पासवर्ड टाकायचा आहे. Captcha भरायचा आहे आणि आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकायचा आहे. कृषिताई विषयाची माहिती भरायची आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा https://mahapocra.gov.in/site/upload/margdarshak/Krushitai%20guidelines%20Letter%20dt.27.2.2025.pdf

हो. कृषिताईची निवड ग्रामसभेमार्फत करावयाची आहे. ग्राम कृषी विकास समितीने या कृषिताईकडून तिला नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांनुसार काम करून घ्यायचे आहे.

प्रकल्प गावाकरिता कृषिताईची नेमणूक मानधन तत्त्वावर करण्यात येणार आहे. प्रकल्पाकडून तिला प्रतिमहिना रुपये १०००/- मानधन देण्यात येणार आहे.

प्रशासक असलेल्या गावात कृषिताईची निवड ग्रामसभेमार्फत करावी.

स्वयंसेवक

प्रकल्पाच्या https://mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर PoCRA Application मध्ये GKVS tab आहे. कृषी सहाय्यकाने यामध्ये लॉगिन करण्यासाठी https://teamndksp.mahapocra.gov.in/ या पोर्टलद्वारे प्राप्त Username आणि आधार क्रमांकावर आधारित बदललेला पासवर्ड टाकायचा आहे. Captcha भरायचा आहे आणि आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकायचा आहे. गावस्तरावरील स्वयंसेवक विषयाची माहिती https://gkvsndksp.mahapocra.gov.in/ वर भरावयाची आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा https://mahapocra.gov.in/site/upload/margdarshak/Letter%20dt.10.1.2025%20Guidelines%20for%20appointment%20of%20swayamsewak.pdf

प्रशासक असलेल्या गावात ग्राम कृषी विकास समिती अस्तित्वात नसते. अशा वेळी प्रशासकाने कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या मदतीने प्रकल्पाने ठरवलेल्या निकषांनुसार गावासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक व्यक्तींची नावे घ्यावीत. त्यामधून चार स्वयंसेवकांची निवड करावी, ज्यामध्ये कमीत कमी दोन महिला असाव्यात. सदर निवडीस आगामी ग्रामसभेमध्ये मंजुरी घेण्यात यावी.

गावकऱ्यांमध्ये मृद व जलसंधारणाच्या कामांबरोबरच भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी गावस्तरावर स्वयंसेवकांची निवड करावयाची आहे.

प्रकल्पामुळे गावात बदल घडवून आणण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी स्वयंसेवक पुढील कामकाज करतील १ प्रकल्पांतर्गत मृद व जलसंधारण कामे, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यासंबंधी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, त्याचे महत्त्व पटवून देणे आणि लोकसहभाग वाढवणे. २ सूक्ष्म नियोजन प्रक्रियेदरम्यान गाव अनुकूलन आराखडा तयार करताना गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे ३ प्रकल्पांतर्गत होणारी मृद व जलसंधारण कामे संपूर्ण गावाच्या शाश्वत विकासासाठी अत्यावश्यक आहेत. या कामांची मालकी गावाचीच असणार आहे, याची जाणीव गावकऱ्यांमध्ये निर्माण करणे. ४ गाव आराखड्यात प्रस्तावित केलेल्या मृद व जलसंधारण कामे पूर्ण होण्यासाठी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करणे. ५ प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांदरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. ६ पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्यासाठी सूक्ष्म सिंचन प्रणालीचा अवलंब वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती करणे. ७ गावातील संरचनांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचा अतिशयक्त उपसा टाळण्यासाठी जनजागृती करणे.

सूक्ष्म नियोजन प्रक्रियेसाठी आवश्यक लोकसहभाग मिळवण्यासाठी स्वयंसेवक प्रयत्नशील राहील. गाव बैठक, सूक्ष्म नियोजन तंत्र (जसे की लक्ष्यगट चर्चा, शिवार फेरी, श्रमदान), ग्राम कृषी विकास समिती सभा, महिला सभा आणि ग्रामसभा दरम्यान स्वयंसेवकाची उपस्थिती आवश्यक असेल. यासाठी होणाऱ्या विविध प्रशिक्षणांमध्येही त्यांना उपस्थित राहावे लागेल. सूक्ष्म नियोजन प्रक्रिया ही पाच दिवसांची असून, प्रतिदिन ₹500 प्रमाणे एकूण ₹2500 इतके मानधन स्वयंसेवकांना मिळेल

पेसा गावे

हो, प्रकल्प टप्पा-२ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांपैकी जी गावे अनुसूचित क्षेत्रातील आहेत, त्या गावांमध्ये पेसा कायद्यानुसार प्रकल्पाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर लागू करण्याबाबत) नियम, २०१४ मधील पेसा नियम ४ नुसार नव्याने घोषित झालेल्या गावांची यादी प्राप्त करून घ्यावी.

पेसा नियम ४ नुसार नव्याने घोषित झालेल्या गावामध्ये गठीत झालेल्या संसाधन नियोजन व व्यवस्थापन समिती, सामूहिक वनहक्क समिती तसेच ग्रामसभा कोष समिती इत्यादी समित्यांच्या सदस्यांना देखील सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये समाविष्ट करावे.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधित उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर शासन करण्याबाबत) नियम, २०१४ मधील पेसा नियम ४ नुसार नव्याने घोषित झालेल्या गावांचे आराखडे स्वतंत्रपणे तयार करावयाचे असल्यामुळे प्रत्येक पेसा गावामध्ये सूक्ष्म नियोजन प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवण्यात यावी. अधिक स्पष्टीकरणासाठी संबंधित पत्र वाचावे.

१. महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तार करण्याबाबत) नियम, २०१४ मधील पेसा नियम ४ नुसार नव्याने घोषित केलेल्या गावांना त्यांच्या कार्यवाहीसाठी स्वअनुमतीने कोणताही वरिष्ठ अधिकारी नियुक्त करता येतो.त्यानुसार सूक्ष्म नियोजन प्रक्रियेसाठी अध्यक्ष निवडून ग्रामसभा बैठक घेण्यात यावी.
२.हो, पेसा गावांमध्ये सूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबविल्यानंतर तयार केलेल्या गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखड्यांना पेसा गावांच्या ग्रामसभेमध्ये मंजुरी घेण्यात यावी.
३. महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधित उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तार करण्याबाबत) नियम, २०१४ मधील पेसा नियम ४ अन्वये घोषित गावांच्या ग्रामसभांनी मंजूर केलेल्या हवामान अनुकूलन आराखड्यांना संबंधित महसूल गावाच्या आराखड्यामध्ये एकत्रित करावे. त्यानंतर संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीतील ग्राम कृषी व विकास समितीच्या शिफारसीनुसार तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठवावे.

पेसा ग्रामपंचायतीकरिता एका महिन्याची पेसा ग्रामसभा मोबिलायझरची नियुक्ती ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. रा.गां.प.-2016/प्र.क्र.101/योजना-4, दिनांक 22.01.2018 अन्वये करण्यात आलेली आहे. पेसा गावे असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ग्राम कृषी व विकास समितीसाठी सदर ग्रामसभेमध्ये मोबिलायझर यांनी नामनिर्दिष्ट व्यक्ती म्हणून उपस्थित राहण्याबाबत सूचना द्याव्यात. ग्रामविकास विभागामार्फत राज्य पेसा कक्ष अंतर्गत जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यरत पेसा व्यवस्थापक आणि पेसा प्रशिक्षक यांनाही सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावे.

संपर्क साधा

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP), ३० ए/बी, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४००००५.

  • ०२२-२२१६३३५२( प्रकल्प बाबींच्या माहितीसाठी )
  • सकाळी ९:४५ ते संध्या.६:१५ सोमवार ते शुक्रवार (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता)
  • भ्रमणध्वनी : ७९००१६४३१४

© कृषि विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.

Vichara