नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २.०

( महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प )
English

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुकाणू समिती कार्यरत असेल. या समितीतील सदस्य व त्यांची जबाबदारी खाली नमूद करण्यात आली आहे.

अनु.क्र. नाव पदनाम
मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन अध्यक्ष
श्री. रणधीर सावरकर, विधानसभा सदस्य सह अध्यक्ष
सचिव/ प्रधान सचिव/ अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग सदस्य
सचिव/ प्रधान सचिव/ अपर मुख्य सचिव, वित्त विभाग सदस्य
सचिव/ प्रधान सचिव/ अपर मुख्य सचिव, सहकार व पणन विभाग सदस्य
सचिव/ प्रधान सचिव/ अपर मुख्य सचिव, कृषि विभाग सदस्य
सचिव/ प्रधान सचिव/ अपर मुख्य सचिव, पदुम विभाग सदस्य
सचिव/ प्रधान सचिव/ अपर मुख्य सचिव, जलसंधारण विभाग सदस्य
आयुक्त, कृषि, कृषि आयुक्तालय, पुणे सदस्य
१० कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी सदस्य
११ कुलगुरू, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला सदस्य
१२ कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी सदस्य
१३ प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प सदस्य सचिव
१४ निमंत्रित सदस्य आवश्यकतेनुसार व अध्यक्षांच्या अनुमतीने

सदर सुकाणू समितीची कार्ये व जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत :

  • प्रकल्प अहवाल, प्रकल्प अंमलबजावणी आराखडा व विविध कार्यप्रणाली पुस्तिका (Manuals) इ. तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे, त्यास मान्यता देणे व मंत्रिमंडळाची मान्यता घेणे.
  • प्रकल्प अंमलबजावणीसाठी धोरणात्मक बाबीसंबंधी मार्गदर्शन करणे.
  • वार्षिक कृति आराखड्यास मान्यता देणे व आढावा घेणे.
  • प्रकल्पासंबंधित वेगवेगळ्या विभागामध्ये समन्वय साधण्यासंबंधी निर्देश देणे.
  • प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यामध्ये परिस्थितीनुरूप आवश्यक बदलास मान्यता देणे. तसेच, जागतिक बँकेच्या सूचनांप्रमाणे विविध पुस्तिकांतील बदलास मान्यता देणे.
  • प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यातील घटकांच्या/ बाबींच्या अंमलबजावणीबाबत तांत्रिक सल्ला देणे.

संपर्क साधा

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP), ३० ए/बी, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४००००५.

  • ०२२-२२१६३३५२( प्रकल्प बाबींच्या माहितीसाठी )
  • सकाळी ९:४५ ते संध्या.६:१५ सोमवार ते शुक्रवार (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता)
  • भ्रमणध्वनी : ७९००१६४३१४

© कृषि विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.

Vichara