फळबाग लागवड, बांबू लागवड आणि वानिकी अंतर्गत वृक्षलागवडीसाठी महत्वाची सूचना :
तपशील
सूचना
1) पूर्व संमती प्राप्त शेतकरी
नोव्हेंबर,२०२२ पर्यंत लागवड करून अनुदान मागणी डीबीटी प्रणालीवर अपलोड करावी.
2) सन २०२२-२३ मध्ये लागवड करू इच्छिणारे शेतकरी
डीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. त्या नंतर लागवडीसाठी अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
पाण्याचा ताळेबंद तयार करणे बाबत ई-प्रशिक्षण
प्रकल्प क्षेत्रातील गावांचे सूक्ष्म नियोजन प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे सदर गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणे. क्षेत्रीय पातळीवर सदर जबाबदारी संबधित गावचे कृषि सहाय्यक यांची असून त्यांना याबातचे सखोल प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्याबरोबरच कृषि विभागातील व प्रकल्पामध्ये कार्यरत अधिकाऱ्यांना व इतर कर्मचाऱ्यांना देखील पाण्याच्या ताळेबंदाची कार्यपद्धती माहिती व्हावी या उद्देशाने ई-प्रशिक्षण आयोजित केले होते.
संदर्भांसाठी खालील संबंधित PDF डाउनलोड करा.