तपशील | सूचना |
---|---|
1) पूर्व संमती प्राप्त शेतकरी | नोव्हेंबर,२०२२ पर्यंत लागवड करून अनुदान मागणी डीबीटी प्रणालीवर अपलोड करावी. |
2) सन २०२२-२३ मध्ये लागवड करू इच्छिणारे शेतकरी | डीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. त्या नंतर लागवडीसाठी अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. |
जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सगुणा बाग, नेरळ (ता. कर्जत) येथील संवर्धित शेती केंद्राला भेट दिली. यावेळी आशियाई कृषी पद्धती व्यवस्थापक ऑलिव्हर ब्रेड्ट, टास्क टीम लीडर रंजन सामंतराय, कृषीव्यवसाय विशेषज्ञ सौम्या श्रीवास्तव, सागर खटकाळे व इतर. ०५.०९.२०२३
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या भाषिणी संस्थेसोबत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वतीने सामंजस्य करार करण्यात आला.
तुषार सिंचन, शेती पंप आणि पाईप संचांसाठी १३६१ कोटींहून अधिक अनुदान प्रकल्पातून देण्यात आले आहे.
पोकरा प्रकल्पाअंतर्गत सूक्ष्म सिंचन पद्धतीत सकारात्मक परिवर्तन घडत आहे. ठिबक सिंचनासाठी २ लाख १३,६८९ अर्जांप्रति १६२० कोटी रुपये अनुदान प्रकल्पातून देण्यात आले आहे.
शेततळ्यांसाठी 7299 अर्जांप्रति 135.89 कोटी, अस्तरीकरणासाठी 2979 अर्जांप्रति 28.86 कोटी, मत्स्यपालनासाठी 1987 अर्जांप्रति 5.04 कोटी असे प्रकल्पाअंतर्गत एकूण 12,265 लाभार्थी शेतकऱ्यांना 169.79 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.
विविध सूक्ष्मसिंचन पटट्यांतील शेतकऱ्यांना १३२१ नवीन विहिरी व ४६४ पुनर्भरणासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पातून ३० कोटी रुपयांहून अधिक अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.
Visitor's counter live from 4th March 2024