प्रकल्पाची संक्षिप्त माहिती

मागील काही वर्षांपासून पावसाचे असमान वितरण तसेच पावसातील मोठे खंड, मान्सूनचे उशीरा होणारे आगमन, अवकाळी पाऊस व गारपीट इत्यादी समस्यांना राज्यास वारंवार तोंड द्यावे लागतं आहे.परिणाम स्वरूपी तीव्रदुष्काळ अथवा टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण होणे आणि त्यामुळे कृषि उत्पादनात आणि उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात घट होऊन कृषि विकासाचा दर लक्षणियरित्या घटत आहे. या घटत्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांमध्ये तणावग्रस्तता वाढीस लागली आहे.

एकंदरीत अलीकडील काळातील हवामानातील सदर लक्षणीय बदलांमुळे राज्यातील कृषि क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहत आहेत. सदर हवामान बदलानुकूल कृषि विकासाकरिता तसेच, प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी घटत्या उत्पन्नामुळे तणावग्रस्त न होता त्यांनापूर्वीच्या सुस्थितीत पुर्नस्थापित होता यावे म्हणून कृषि क्षेत्र व पर्यायाने शेतकऱ्यांनी सक्षम होण्याकरिता राज्यात हवामान अनुकूल कृषि प्रकल्प म्हणजेच ‘नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प’ (Project on Climate Resilient Agriculture)’ जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरु करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडयातील निवडक दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्टयातील निवडक गावांमध्ये कार्य प्रगतीपथावर आहे.

प्रकल्प नकाशा

अधिकृत यूट्यूब (YouTube) पेज

Subscribe